आपल्या आयुष्य मध्ये काही गोष्टी इतक्या सहज जुळून येतात कि
त्यामुळे आपल्याला नियतीचे आभारच मानावेसे
वाटतात .आमची पॅरिस वारी हा सुद्धा असाच एक जुळून आलेला दुग्ध शर्करा योग.
माझा धाकटा भाऊ मंदार....
phd पूर्ण
झाल्यावर त्याला पॅरिस मधील Lui Pasture संस्थे मध्ये काम
करण्याची संधी मिळाली . ऑक्टोबर २०१६ मध्ये पॅरिसला प्रस्थान झाले. त्याची अर्धांगिनी मधुरा
, एक महिन्यांनी
त्याच्या प्रवासात त्याची सोबती झाली. एका छोट्याश्या घरातून त्यांचा संसार सुरु झाला हल्ली मोबाइल फोन वर उपलब्ध
झाल्येला whatsapp ,
skype रुपी संपर्क साधनांमुळे "हे विश्वची माझे घर " ह्या उक्तीची प्रचिती आपल्याला येत असते . त्यामुळेच पॅरिसचा
इथंयम्भूत वृत्तांत मिळत होता. आयफेल टॉवर
आम्हाला खुणावत होता. मंदार मधुरा पॅरिस जवळील नव नवीन ठिकाणे त्याचे फोटो
आम्हाला पाठवीत असत. कधीतरी हे सौंदर्य
याची देही याची डोळा पाहण्याचं निश्चय मनाशी पक्का झाला होता . आणि अखेर तो निर्णय
घेण्याची वेळ आली. मंदारचे पॅरिस मधील वास्तव्य २०१९ मध्ये संपणार होते. दोन वर्षे
तेथे राहिल्याने त्यालात्या शहराची खडान्खडा माहिती झाली होती. आमच्या ट्रीपसाठी
त्याच्या अनुभवाचा आम्हाला फायदा होणार होता . डिसेंबर २०१७ मध्ये आम्ही
त्यादृष्टीने पॅरिसवारीच्या शक्याशक्यता पडताळण्यास सुरुवात केली .
पुण्यातील
सुप्रसीध्द optician परांजपे (
मधुराचे वडील ) आमचे व्याही झाल्यामुळे अजून एका धमाल कुटुंबाशी आमची नाळ जोडली
गेली. प्लेजर ट्रॅव्हल्सच्या सुजाता जोशी ह्या त्याच कुटुंबाचा एक भाग...
पॅरिसवारीसाठी त्यांचे मार्गदर्शन घेण्याचे ठरले , माझे कुटुंब, माझ्या भावाचे कुटुंब, आमच्या एका
मित्राचे कुटुंब आणि माझी मावशी व तिचा नातू.. असा अकरा जणांचा चमू जमला . ९ मे
२०१८ हि तारीखही ठरली. आमच्या जवळ सहा महिन्यांचा कालावधी होता. आम्ही जाणार तो काळ पीक पिरियड असल्यामुळे सर्व
बुकिंग आधीच करणे क्रमप्राप्त होते. ट्रॅव्हल आयटीनरी ठरवताना एकूण वास्तव्याचा
काळ व बघावायची प्रेक्षणीय स्थळे सुनिश्चित
करायची होती. आमच्यापुढे दोन पर्याय होते बेल्जियम - पॅरिस किंवा
स्वित्झर्लंड - पॅरिस . शेवटी सर्वांची पसंती पृथ्वीतलावरील स्वर्ग ज्याला म्हटले
जाते अशा स्वित्झरलँडला मिळाली.
दिवसां मागून दिवस
सरत होते तशी आमची उत्कंठाही वाढत होती . विझा
अँप्लिकेशनची सर्व तयारीही झाली होती. VFS सेण्टरमुळे
विझा आप्लिकेशनची सर्व प्रक्रिया अत्यंत
सुकर झाली आहे.
आमच्या सर्वांची अपॉइंटमेंट एकाच दिवशी असल्याने त्याच
दिवसापासून पॅरिस ज्वर चढावयास सुरुवात झाली . धमाल मस्ती चालू झाली. पण दुधात
मिठाचा खडा पडावा तास मावशीचा विझा नाकारल्याची बातमी आली. आम्ही सर्व गर्भगळीतच
झालो होतो. तिचे सर्व बुकिंग अगोदरच झाले असल्याने होणारे नुकसानहि बरेच होते. पण
आमची मावशी हार मानण्यातली नव्हती.योगेश्वरावर हवाला ठेवून तिने परत विझा
अँप्लिकेशन केले आणि अखेर तो भगवंत पावला. विझा मंजूर झाल्याचा फोन आल्यावर आम्ही
अक्षरशः नाचलो आणि जोमाने
पुन्हा पॅरिसच्या तयारीला लागलो. पण आमच्या मागचे
शुक्लकाष्ठ काही संपणार नव्हते. मंदारने पॅरिसमधील मेट्रोच्या कामगारांचा संप
असल्याचे आधीच कळवले होते.. भरीसभर म्हणून आमचे एअर फ्रान्सचे पायलट strike मुळे delay असल्याचा मेल निघण्याच्या दोन दिवस आधीच
मेलबॉक्समध्ये येऊन थडकला होता . ९ मे रोजी आमचे departure जवळ जवळ बारा तास
लांबले. आमचे पुढील वेळापत्रक कोलमडणार
होते. ९ मे रोजी रात्री आठ वाजताचे आमचे आयफेल टॉवरचे बुकिंग होते. पण विमान उशिरा सुटणार असल्याने
आयफेल टॉवर बघण्याची आमची संधी हुकणार कि काय अशी धास्ती आम्हाला वाटू लागली.


पूर्वरंग वाचून मजा आली
ReplyDelete