१२ मे रोजी palace of versallies ला भेट द्यायचा कार्यक्रम ठरला. १८६२ साली ह्या पॅलेसची
स्थापना झाली. फ्रान्सचा राजा लुई १६ ह्याचे वास्तव्य ह्या पॅलेसमध्ये होते. ह्या
पॅलेसच्या परिसरात ८०० हेक्टर परिघामध्ये बसलेली एक सुंदर बाग आहे. त्या बागेत
कलाकुसर केलेले सुंदर लॉनं व एक भव्य कारंजेही आहे. एका प्रशस्थ महालामध्ये फ्रेंच
राज्यक्रांतीच्या युद्धामधील ऐतिहासिक प्रसंग चित्ररूपाने प्रदर्शित केले आहेत. हॉल ऑफ मिरर मध्ये ३५० आरशांचा वापर
अत्यंत कलात्मक पद्धतीने केला आहे. राजा राणीच्या महालाकडे जाणारा पेसेज असेही
ह्या हॉलला संबोधतात. ह्या हॉल मध्ये असंख्य झुंबरांवर मेणबत्त्या शांतपणे तेवत
असतात . पर्यटकांची खूप गर्दी असते पण कुठेही गडबड गोंधळ नसतो. एकंदरीतच भव्यता हा
पॅरिसमधील वस्तूंचा स्थायी भाव आहे. त्याबरोबरच कलाकुसर केलेली छते , शिल्पे , भिंतीवर रेखाटलेली चित्रे यांची रेलचेल असते. पॅलेस
भ्रमंती झाल्यावर त्या परिसरात असलेली एका बाकड्यावर आम्ही न्याहारी करावयास बसलो.
ह्या वेळी मुंबईहून आणलेले ठेपले व दही असा बेत होता. ह्या पॅलेसला अलविदा करून
आम्ही परतीच्या वाटेल लागलो. त्या दिवशी लवकर झोपावे लागणार होते, कारण दुसरा दिवस कार्यक्रमांनी भरगच्च होता. आमची स्वित्झरलँड सफर सुरु होणार
होती. सकाळी ७-३० वाजता चार्ल्स दे गौले विमानतळावरून विमान सुटणार होते. त्यामुळे
पहाटे ५-३० वाजताच विमानतळावर पोहोचायचे होते.



No comments:
Post a Comment