Monday, 30 July 2018

ऱ्हाईन फॉल




ह्या अनुभवावरून  धडा घेऊन दुसऱ्या दिवशी आम्ही जवळच्यायच मायग्रोस मॉल मध्ये गेलो. त्या मॉल मध्ये बेकरी पदार्थ, सफरचंदे, पेर, द्राक्षे , बुरबेरीस ,

स्ट्रॉबेरीज , असंख्य प्रकारचे चीज, स्नॅक्स असे बरेच खाद्यपदार्थ होते. आम्ही सगळी बेगमी करून अपार्टमेन्टवर परततो. हा दिवस रिलॅक्स होता. आम्ही आरामात उठलो. त्यादिवशी आम्ही rhyne धबधबद्यांवर जाणार होतो. rhine ला जायला लुसर्नवरून ४५ मिनिटांवर असलेल्या शॅफ्हुसेन या स्टेशनवर उतरून १५ मिनिटे चालत जायला लागते .या ठिकाणी पोचण्यासाठी लिफ्टने खाली उतरावे लागते. पर्यटकांची कुठलीही गैरसोय होऊ नये ह्याची उत्तम काळजी घेतली जाते. ह्या धबधब्याची निर्मिती बर्फयुगात म्हणजे साधारण १४०० ते १५००० वर्षांपूर्वी झाली अशी वदंता आहे. हा यूरोपमधील सर्वात मोठं धबधबा आहे. आम्ही ह्यामध्ये फिरण्यासाठी १५ मिनिटांची बोट राइड घेतली होती . प्रचंड वेगाने येणाऱ्या पाण्याचे अंगावर तुषार उडत होते. नावाड्याने  आम्हाला धबधब्याच्या तोंडाशी नेले तेव्हा तर आम्ही अचंबित झालो . पाण्याच्या प्रचंड आवाजामुळे काहीच ऐकू येत नव्हते. बऱ्याच दिवसांनी लक्ख सूर्यप्रकाश पडल्यामुळे आम्हाला इंद्रधनुष्याचे दर्शनही झाले. 


बोट राईड झाल्यावर आम्ही बाहेर पडलो, तेथे इंडियन स्ट्रीट फूडचे दुकान होते. बटाटे वडे काचेतून डोकावत होते. चहाची तल्लफ आल्याने आपसूकच पावले तिकडे वळली. वडे बघून तोंडाला पाणी सुटले. पण लोकांनी कचरापेटीत टाकलेले वडे बघून आमची ती इच्छा क्षणभंगुरच ठरली. चहावरच समाधान मानून आम्ही तेथून काढता पाय घेतला. 

No comments:

Post a Comment

पूर्वरंग

आपल्या आयुष्य मध्ये काही गोष्टी इतक्या सहज जुळून येतात कि त्यामुळे आपल्याला   नियतीचे आभारच मानावेसे वाटतात .आमची पॅरिस वारी हा सुद...