११ मे ला आम्ही
पॅरिसची पर्वती म्हणजेच मॉन्टमेरो चर्च बघायला गेलो. ह्या चर्च मधून संपूर्ण
पॅरिसचे विहंगम द्रुष्य दिसते. बाजूच्या
गल्लीत टिपिकल फ्रेंच रेस्टॉरंट आहेत. तेथे बसून चित्रकार येणाऱ्या जाणाऱ्या
पर्यटकांचे काहीं मोबदला घेऊन पोर्ट्रेट काढत असतात. त्या शहरामध्ये
सार्वजनिक टॉयलेट्स फारच तुरळक आहेत, त्यामुळे तुम्हाला हलके
होण्यासाठी रेस्टोरंन्टचा आसरा घ्यावा
लागतो व दमड्याही मोजाव्या लागतात
मोन्ट्मेरोतील अशाच एका रेस्टॉरंट मध्ये हलके होण्यासाठी आम्ही प्रवेश केला.
वेटरने आमचे हसतमुखाने स्वागत केले व आसन
व्यवस्था केली व मेनू कार्ड समोर ठेवले. ते फ्रेंच भाषेतून असल्याने
आम्हाला ओ कि ठो काळत नव्हते. परंतु आम्हाला हवी असलेली कॉफी त्यामध्ये नव्हती .
तो पर्यंत आमचा कार्यभाग उरकलेला होता व दमड्या न मोजता हलके होण्याचा आनंद आमच्या चेहऱ्यावर झळकत होता.
त्या संध्याकाळी
आम्ही तेथील भारतीय रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेलो . ऑर्डर घेणारी श्रीलंकन महिला
वेटर स्वतःच सर्विसही करीत होती . आम्ही मुंबईतल्या सवयी प्रमाणे एकामागून एक
ऑर्डर दिल्याने तिचा पार गोंधळ उडाला . दोन कूक व एक लेडी वेटर अशा इन मिन तीन
जणांवर हॉटेल चालू होते. पण पदार्थांची चव चांगली असल्याने मनाचे समाधान झाले.
No comments:
Post a Comment