आमची पॅरिसची
ट्रिप आम्ही स्वतःच आखल्यामुळे ट्रॅव्हल कंपनीबरोबर प्रवास करताना असतात
तशी बंधने नव्हती. तिसऱ्या दिवशी बाकीची मंडळी विश्रांती घ्यायचे ठरवितात
आणि मी एकटाच भ्रमंती करण्यास बाहेर पडतो.
मंदारकडून सर्व माहिती घेऊन ठेवली असते व
जोडीला मोबाईल मधील मॅप असतोच. मंदारच्या घर जवळच ट्रामचे स्टेशन आहे . दर तीन
मिनिटांनी ट्राम येत असतात. तेथील सर्वच स्टेशनवर gps द्वारे तुम्हाला ट्रेन येण्याचा अवधी कळतो . ९ ते १२ मे पॅरिसमध्ये सार्वजनिक सुट्टी होती .
त्यामुळे ट्राम , बसमधे बऱ्यापैकी गर्दी होती.
मी बसमधून तेथिल
जगप्रसिद्ध ऑपेरा थिएटर जवळ उतरलो .ह्या थिएटरला अकादमी ऑफ ऑपेरा असेही म्हणतात.
१८६१ साली ह्या ऑपेराची स्थापना झाली. तेथे प्रवेश करण्यासाठी ११ युरो तिकीट आहे
.भारतीयांबरोबरच तेथे चिनी पर्यटकांची सुद्धा गर्दी होती . आतमध्ये प्रवेश करताच
अंतर्गत सजावटींमधून ठायी ठायी कलात्मकतेचा अविष्कार पाहायला मिळत होता . प्रेक्षकांसाठी तेथे ३ मजली
दालने आहेत. सुमारे २००० दर्शक बसू शकतील
एवढी ह्या प्रेक्षागृहाची क्षमता आहे . मी एका दालनात प्रवेश केला तेव्हा आतमधील
भव्यता बघून आश्चर्यच झाले. तेथील व्यासपीठावर एका जोडप्याचा ballet नृत्याचा सराव चालू होता . थिएटर बघून बाहेर पडलो तेव्हा बाहेरच्या चौथऱ्यावर
८-१० जोडपी ballet नृत्य करीत होती. संथ पार्श्व संगीतावर त्यांचे नजाकत भरे
नृत्य बघून गम्मत वाटत होती ऑपेरा
थिएटरच्या दर्शनी भागात आपल्या एशियाटिक लायब्ररीची आठवण होईल अश्या पायऱ्या आहेत
. त्या पायऱ्यांवर बसून तुम्ही सभोवतालचा परिसर न्याहाळू शकता .
तेथेच एक सोनेरी रंगाने मढलेला जिवंत माणसाचा पुतळा उभा होता. येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांना दचकवून सगळ्यांचे मनोरंजन करीत होता. त्याच्या झोळीत तुम्ही पैसे टाकलेत कि तुम्ही त्याच्या सोबत फोटोही काढू शकत होतात . एक गायक गिटार घेऊन इंग्लिश गाणी गात सर्वांचे मनोरंजन करीत होता. अर्थार्जनासाठी येथील निवासी आपल्यातील कलागुणांचा असा खुबीने वापर करतात. त्यात त्यांना कुठलाही कमीपणा वाटत नाही.
तेथेच एक सोनेरी रंगाने मढलेला जिवंत माणसाचा पुतळा उभा होता. येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांना दचकवून सगळ्यांचे मनोरंजन करीत होता. त्याच्या झोळीत तुम्ही पैसे टाकलेत कि तुम्ही त्याच्या सोबत फोटोही काढू शकत होतात . एक गायक गिटार घेऊन इंग्लिश गाणी गात सर्वांचे मनोरंजन करीत होता. अर्थार्जनासाठी येथील निवासी आपल्यातील कलागुणांचा असा खुबीने वापर करतात. त्यात त्यांना कुठलाही कमीपणा वाटत नाही.
येथे फिरताना
तरतर्हेची लोक दिसतात . पॅरिस म्हणजे फॅशनची पंढरीच , त्यामुळे विविध तऱ्हेचे पेहेराव बघायला मिळतात . तेथील राहणीमान एकंदरीत
आरामशीर आहे. दिवसाच्या कुठल्याही प्रहरी
कुणी आजी आजोबा वाइनचा निवांतपणे आस्वाद
घेत असतात तर कुणी आपल्या मित्रमैत्रिणीसमवेत थंडगार बिअर किंवा कॉफीचा आनंद घेत
असतात. तेथील रेस्टॉरंट्स, कॅफेस मध्ये फूटपाथवर टेबले खुर्च्या टाकून
बसण्याची व्यवस्था केलेली असते.

सुंदर.
ReplyDeleteरमयनगरी आहे.फोटोग्राफी अपरतिम.
Thanks
DeleteMasta....khup Sundar.....with the help of your description I personally took a small detour of Paris....😀 keep posting such info....for motivating others to visit and express their experiences....
ReplyDeleteDhanyvaad
Delete