१६ मे रोजी आल्प्स पर्वतांमध्ये वसलेल्या माऊंट टिटलिसला भेट देण्याचा मानस होता. तेथे जाण्यासाठी लुसर्न वरून ऍजेलबर्ग ह्या गावी उतरावे लागते . साधारण ४५ मिनिटांचा नयनरम्य प्रवास करून ऍजेलबर्गला उतरल्यावर कॅबेलकारने टिटलिसला नेतात केबलकार आपल्याला १०००० फूट उंचीवर असलेल्या माऊंट टिटलिसवर घेऊन जाते. तिथे प्रवेशद्वारावर “दिलवाले दुलहनिया ले जायेंगे” चित्रपटातील काजोल आणि शाहरुखचा कट आउट ठेवला आहे. भारतीय पर्यटक त्याजवळ उभे राहून सेल्फीची हौस भावून घेत होते.
यश चोप्राने आपल्या
चित्रपटांमधून स्वित्झरलँडचे सौंदर्य नावारूपाला आणले. यासाठी स्विस सरकारने
त्यांचं पूर्णाकृती पुतळा इंटरलाकेन येथे उभारून त्यांना मानवंदनाचं दिली आहे.
टिटलिसवर उंगफ्राऊच्या मानाने तापमान जास्त होते. येथीहि स्नो फॉल चालूच होता. या
ठिकाणी भारतीय उपहारगृह आहे तेथेच आम्ही जेवलो. संध्याकाळी ५ वाजता आम्ही परतीच्या
प्रवासाला लागलो.
हा आमच्या
स्वित्झरलँडमधील वास्तव्याचा शेवटचा दिवस होता.सामानाची बांधाबांध करून
दुसऱ्यादिवशी युरोरेलने पॅरिस गाठायचे
होते. ४ दिवस कसे भुर्र्कन उडून गेले ते कळलेही नाही. ताशी ३२५ kmph च्या स्पीडने यूरोरेलचे मार्गक्रमण चालू होते.
विशेष म्हणजे एवढ्या वेगाने जाऊन सुद्धा पोटातील पाणी देखील हलत नव्हते.
संध्याकाळी ७-३० वाजता गियर लायन पॅरिस ह्या स्टेशनवर पोहोचलो . तेथेच मंदार भेटला आणि आम्ही त्याच्या
अपार्टमेन्टवर पोचलो. शेवटचा दिवस असल्याने परत सामान बांधायची लगबग चालू झाली.
"केल्याने देशाटन ,
पंडित मैत्री, सभेत संचार,
मनुजा, ज्ञान येतसे फार ... "
लहानपणापासून
अनेकदा ऐकलेली म्हण , पण या ओळींची मी
सत्यता अनुभवली ती आमच्या पॅरिस वारी मध्ये ...
पॅरिस विरहाची घटिका समीप येत होती. ते
मंतरलेले दिवस संपणार होते .काही गोष्टी काल
मर्यादेमुळे बघायच्या राहून
गेल्याची रुखरुख होती. परंतु कुठेतरी पूर्णविराम देणे अपरिहार्य होते. सुखद
आठवणींचे गाठोडे घेऊन आम्ही परतीच्या विमानात चढतो. तो दहा दिवसांचा कालखंड आमचे
जीवन समृद्ध करून गेलेला असतो. एका चारोळीने ह्या प्रवास वर्णाची सांगता करावीशी
वाटते...
" छोट्याश्या या आयुष्यात
खूप काही हवं असत...
असंख्य चांदण्या भरून सुद्धा ..
आपलं आभाळ रिकामं असत....
"










