. त्या दिवशी लवकर
झोपावे लागणार होते, कारण दुसरा दिवस कार्यक्रमांनी भरगच्च होता.
आमची स्वित्झरलँड सफर सुरु होणार होती. सकाळी ७-३० वाजता चार्ल्स दे गौले
विमानतळावरून विमान सुटणार होते. त्यामुळे पहाटे ५-३० वाजताच विमानतळावर पोहोचायचे
होते.
ह्या विमानतळावर
स्वयंचलित चेकिन करावे लागते म्हणजे आपणच आपले सामान उचलून वजन काट्यावर ठेवायचे वजन करायचे व टॅग लावून लुगेज
पट्ट्यावर ठेवायचे . मॅनपॉवर कॉस्टकटिंगचे
सूत्र येथील विमान कंन्यानी सुद्धा अंगिकारले आहे.
पॅरिस ते झुरिच
साधारण दिड तासाचा विमान प्रवास आहे . जसजसे झुरिच जवळ येत होते
तसे बर्फ़च्छादित पर्वत राजींचे दर्शन
व्हावयास सुरुवात होते. झुरिच स्टेशनवरून आम्हाला मेट्रोने लुसर्न
ह्या गावी जायचे होते. झुरिच मेट्रो
स्टेशन एक अवाढव्य पसारा असलेले स्टेशन आहे. येथे जवळपास ४४ फलाट आहेत.
सुजातामावशींनी आमचा ४ दिवसांचा स्विस पास काढला होता त्यामुळे
कुठेही तिकिटासाठी रांगेत उभे राहायचा प्रश्न नव्हता . झुरिच स्टेशनवरील माहिती
केंद्रामध्येही आम्हाला इथ्यंभूत माहिती
मिळाली व आमचं प्रवास सुखकर झाला.
एव्हाना थंडी
वाजायला सुरुवात झाली होती. बॅगांमधून जॅकेट्स, शाली, स्वेटर्स, हातमोजे बाहेर
पडू लागले. झुरिच ते लुसर्न ४५
मिनिटांचा प्रवास आहे. लुसर्नला पोहोचल्यावर सर्व प्रथम बर्गर किंग मध्ये क्षुधा शांती केली. लुसर्नच्या बाहेरच बस
डेपो होता. बसने आम्हाला आल्मइंड ह्या ठिकाणी जायचे होते. airbnb ह्या अँपवरून आम्ही आमच्या अपार्टमेन्टचे बुकिंग केले होते.
airbnb ह्या अमेरिकन कंपनीने
जगभर आपलें रूम स्टे चे जाळे विणले आहे. आपल्या बजेटनुसार आपण जाऊ त्या
देशातील रूम्स बुक करता येतात. ऍप वर आपल्याला रूमचे फोटोस, त्यामधील सोयी सुविधा , नियम व अटि
पाहावयास मिळतात .. आमचे अपार्टमेन्ट २० मजली टोलेजंग इमारतीमध्ये होते.
Allmend AIRBNB building
आम्ही त्या
इमारतीच्या दरवाज्यासमोर उभे राहिलो व दरवाजा आपोआप उघडला. मॅनेजरने आमचे स्वागत
केले . ११ जण असल्याने आम्ही २ अपार्टमेंट्स बुक केली होती. बुकिंगचे सर्व
सोपस्कार पार पडले . आम्ही आमच्या पहिल्या मजल्यावरील रूम मध्ये पोचलो . सर्व
सोयींनी सुस्सज असे अपार्टमेन्ट होते. एका रूम मधील बेड मोडलेला आहे हे कळल्यावर तो मॅनेजर स्वतः टूलकिट घेऊन आला व बेड रिपेअर
करून गेला. कुठल्याही कामात कमीपणा मानायचा नाही हि त्यांची वृत्ती यातून अधोरेखित
होते.
आमच्या इमारतीजवळ
एक फुटबॉल स्टेडियम होते. स्वित्झर्लंड हा
फुटबॉल वेडा देश आहे. त्या स्टेडियम मध्ये तेथील लोकल क्लब्सची मॅच चालू होती. त्यामुळे लोकांची
प्रचंड गर्दी होती.
थोडा आराम
केल्यावर आम्ही संध्याकाळी लुसर्न गाव
फिरायला बाहेर पडलो. बस स्टॉप
घराजवळच होता. बस पकडून आम्ही लुसर्न स्टेशनजवळ उतरलो. स्टेशन समोरच रुस
नावाची नदी आहे.
ह्या नदीवर १३३३ साली चॅपल ब्रिज बांधलेला. हा ब्रिज संपूर्ण लाकडानी बनविला असून यूरोपमधील जुना पूल आहे.
 |
| चॅपल ब्रीज |
संध्याकाळ जशी
सरत होती तशी थंडीची तीव्रताहि वाढत होती. ह्या पुलाजवळच १० मिनिटांच्या अंतरावर
लायन मॉन्युमेंट नावाचे ऐतिहासिक शिल्प आहे. एका तळ्या काठच्या भव्य दगडात हे
शिल्प कोरलेले आहे. एक सिंह दुःखी होऊन निपचित पडलेला दाखविला आहे. १७९२ साली
झालेल्या फ्रेंच राज्यक्रांती दरम्यान मारल्या गेलेल्या सैनिकांच्या स्मृती
प्रित्यर्थ हे स्मारक उभारले आहे.
 |
| लायन मॉन्युमेंट |
लुसर्न दर्शन
संपता संपता रात्र व्हावयास लागली होती आम्ही बस पकडून घराकडे प्रयाण केले. माझी
अर्धांगिनी ऋजुता हिने
स्वित्झरलॅन्ड्ला नेण्यासाठी रेडी टू ईट भाज्या , मूगडाळ खिचडी ,उपमा, पोहे, पोळ्या यांची जय्यत तयारी केली होती. सर्व
मेनूचे प्लांनिंग मुंबईतच झाले होते. त्यामुळे घरी गेल्यावर गरमागरम पोळ्या व आलू मटार
यांचा आस्वाद घेता आला.